राहुल गांधींची एकतेची शपथ

January 30, 2009 5:51 PM0 commentsViews: 2

30 जानेवारी साबरमतीराहुल गांधींनी साबरमती इथं नागरिकांना एक राहण्याची शपथ दिली. दहशतवादाच्या विरोधात सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र यावं, असं आवाहन काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी केलं.महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी साबरमती इथं ही शपथ दिली.त्यांनी दिलेल्या शपथेत माझी जन्मभूमी, भारत माता, हाच सर्वात पहिला माझा धर्म असेल. या देशाची अखंडता कायम रहावी हेच जीवनातील ध्येय असेल. तिरंगा हाच माझा धर्म असेल. सर्व धर्मियांना एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढलं पाहिजे.आता आपलं ध्येय भारताच्या विकासाठी असलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं.

close