आघाडीत जागावाटपावरून पेच,काँग्रेसला हवा19-29चा फॉर्म्युला?

September 12, 2013 3:34 PM0 commentsViews: 947

Image img_201832_aghadi_240x180.jpg12 सप्टेंबर : लोकसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत पेच कायम आहे. 22-26 चा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला काँग्रेसला अमान्य असल्याचं कळतंय. त्याऐवजी काँग्रेसला 19-29 चा नवा फॉर्म्युला हवा आहे. त्यानुसार आता काँग्रेस राष्ट्रवादीला 19 जागांचा प्रस्ताव देणार आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निकालानुसार काँग्रेसला यंदा 3 जागा जास्त हव्या आहेत. समन्वय समितीच्या आगामी बैठकीत याविषयी चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय. काँग्रेसच्या दिल्लीतल्या सूत्रांनी ही माहिती दिलीये.

 

जागावाटपाचा 22-26 फॉर्म्युला कायम राहील, 22 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवेल तर 26 जागांवर काँग्रेस लढवेल अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली होती. याबाबत दिल्लीत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झालीय आणि चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचं जाधव यांनी म्हटलंय. पण जाधवांचा हा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी खोडून काढला होता.

 

आम्ही चर्चा करण्यासाठीच थांबलो नाही. कुठली जागा कोणी लढवायची किती जागांवर लढवयाची याची आकडेवारी सांगणं याला काही आधार नाही असं माणिकराव ठाकरेंनी स्पष्ट केलं. काँग्रेसला 2009 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा 20 जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी काँग्रेसने 3 अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीकडे केलीय. पण राष्ट्रवादीला हे मान्य नाही त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

close