नाशिकमध्ये आसाराम बापूच्या आश्रमावर हातोडा

September 12, 2013 1:27 PM0 commentsViews: 1049

asram bapu nasik12 सप्टेंबर : नाशिक येथील आसाराम बापूच्या आश्रमावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केलीय. नाशिक-गंगापूर रोडवर असलेल्या या आश्रमामधून 18 मीटरचा डीपी रोड जात असून 2008 साली याबाबत आश्रमाला नोटीस देण्यात आली होती.

 

यानंतरही अतिक्रमण हटवण्यात न आल्यानं आज अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली.. या कारवाईला आश्रमातील आसारामच्या भक्तांनी विरोध केला.

 

यावेळी पोलिसांनी विरोध करणार्‍या भक्तांची धरपकड करून सौम्य लाठीचार्ज केला. हे अतिक्रमण जरी हटवलं असलं तरी संपूर्ण आश्रम ज्या जागेवर बांधण्यात आलंय तेच अनधिकृत आहे. तेव्हा हे अतिक्रमण कधी हटणार असा सवाल नाशिककरांकडून केला जातोय.

close