जळगावमध्ये हुंड्यासाठी विवाहितेला जिवंत जाळले

September 12, 2013 2:14 PM0 commentsViews: 523

jalgaon news12 सप्टेंबर : जळगावमध्ये हुंड्यासाठी 22 वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्यांनी अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडलीये. या प्रकरणी या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह 5 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत महिलेची सासू अफसारबी सुलेमान पटेल आणि दीर सलीम सुलेमान पटेल यांना अटक करण्यात आलीय.

 
जळगावातल्या रावेर तालुक्यातील खैरवाडच्या सादिक सुलेमान पटेल यांच्याशी नाजमीन वय 22 हिचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता. लग्नला काही दिवस उलटल्यानंतर नाजमीन माहेरुन हुंडा आणावा तसंच कला शाखेचे दुसर्‍या वर्षी घेत असलेले शिक्षण थांबवावं यासाठी पती,सासू,दीर,दीराची पत्नी यांनी शारीरीक -मानसिक छळ करत मारहाण केली.मंगळवारी सासरी आलेली नाजमीन हिचा शिक्षण, हुंड्याचा वाद न मिटल्याने ती आई सोबत जवळच्या नातेवाईकांकडे मुक्कामी होती.

 

बुधवारी सकाळी 9 वाजता ती पतीकडे घरात ठेवलेली पुस्तके नेण्यासाठी आली असता आरोपी सादिक सुलेमान पटेल,दीर मुक्तार सुलेमान पटेल आणि वासिम सुलेमान पटेल तर दीराची पत्नी यासमीनबी मुक्तार पटेल यांनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. यात तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून 302,498,323,34 अन्वये आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

close