नरेंद्र मोदींच्या उमेदवारीसाठी भाजपची शर्थ

September 12, 2013 7:12 PM2 commentsViews: 687

Image img_234392_narendramodibjp34_240x180.jpg12 सप्टेंबर : भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आहे. यासाठी भाजप आपल्या नेत्यांचा विरोध मोडीत काढून मोदींच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या नावाला हिरवा कंदील दिल्यानंतर भाजपमध्ये उमेदवारीवरुन ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांनी विरोध दर्शवलाय.

 

नरेंद्र मोदी यांना भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याबद्दलचं राजकारण आता अखेरच्या टप्प्यात आलंय. दिल्लीत भाजप नेत्यांच्या बैठकांवर-बैठका झडत आहेत. लालकृष्ण अडवाणींसारख्या सर्वात ज्येष्ठ नेत्याचा विरोध डावलून मोदी यांच्या नावाची उद्याच घोषणा होण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. संघ आणि भाजपच्या नेत्यांनी सातत्यानं मन वळवण्याचा प्रयत्न केला तरीही अडवाणी अजूनही अडून बसलेत.

 

पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदींविरोधात मतदान करू असंही अडवाणींनी राजनाथ सिंहांना कळवल्याचं समजतंय. त्यामुळेच मतदान टाळण्याचा आणि सर्वसहमती बनवण्याचा राजनाथ सिंहांचा प्रयत्न सुरू आहे. राजनाथ सिंहांनी गेल्या चोवीस तासात अडवाणींची एकदा आणि सुषमा स्वराज आणि मुरली मनोहर जोशी यांच्या दोनदा भेटी घेतल्या आहे. दरम्यान, पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे आता उद्या भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होते की राजनाथ सिंह संसदीय मंडळाला टाळून उद्याच मोदींच्या नावाची घोषणा करतात का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, लालकृष्ण अडवाणी यांचे माजी सल्लागार सुधींद्र कुलकर्णी यांनीही मोदींवर टीका केलीय.
सुधींद्र कुलकर्णी यांची मोदींवर टीका

“त्यांनी (मोदींनी) स्वत:ला सामाजिक ध्रुवीकरण करणारा, राजकीय ध्रुवीकरण करणारा नेता म्हणून सिद्ध केलंय. आता तर त्यांनी आपल्या पक्षातच ध्रुवीकरण केलंय. त्यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण, त्यावर एकमत नाही. अटल बिहारींनंतरचे भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते अडवाणी या निर्णयाच्या बाजूनं नाही. किंवा किमान या क्षणी तरी..मला माहीत नाही. पण, ज्येष्ठ नेत्याच्या मान्यतेशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय जर असा व्यक्ती पंतप्रधानपदाचा उमेदवार झाला तर पक्षाबाहेरचे लोक विचारू शकता की हा माणूस स्थिर सरकार देऊ शकतो.”

  • Nitin Shelar

    Lalkrushna Adwani yana tamam bhartiyanchi vinanti ahe ki modi yanchya navala anek sandhisadhu hindu virodhi lok virodh karat ahet tarihi jantechi icha MODI ahet.apan jeshth ani sanman niy ahat mhanun apan MODI yana virodh karun jantecha rosh gheu naye .MODI yana apla ashirwad ani shubhecha milavyat mhanje apla man rahil ulat apan virodh kela tar jantechya najret baherche nahi tar tumhich swatachi pantapradhan bannyach icha ahe mhanun MODINA virodh karta ashich bhavna hoil ani tumchya baddal rag ani anadar hil.
    MODI aaj janteche hero ahet tumhi virodh karun swata khalnayak banu naka.

  • Kiran Pawar

    modi shivay dusara paryay nahi & garaj padali tar adavani la sudha pakshatun kadhun taka pan modinach p.m. chi umedvari dya JAI HIND

close