फाईल्सवरून मलिक-ठाकरे यांच्यात खडाजंगी

September 12, 2013 8:37 PM0 commentsViews: 579

12 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फाईल्सच्या मुद्दयावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आज राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. मुख्यमंत्री हे लोकहिताचे निर्णय प्रलंबित ठेवतात असा असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील खात्यात 50 हजारांपेक्षा अधिक फाईल्स प्रलंबित असल्याची टीका मलिक यांनी केलीये तर त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर टीकेचे आसूड ओढले आहेत. महत्त्वाच्या निर्णयाच्या फाईल्स अर्थ खात्यानंच रोखल्या असल्याचा आरोप माणिकरावांनी केलाय. महत्त्वाच्या फाईल्सबद्दलचे निर्णय ही सामूहिक जबाबदारी असते. मग या प्रलंबित फाईल्सकरता एक़टे मुख्यमंत्रीच जबाबदार कसे असा सवाल माणिकरावांनी केला.

close