मुझफ्फरनगर दंगल:सुप्रीम कोर्टाची युपी सरकारला नोटीस

September 12, 2013 10:28 PM0 commentsViews: 61

Image img_237932_suprimcortoncbi_240x180.jpg12 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमधल्या दंगलीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावलीय. हिंसाचार थांबवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पुरेशी पावलं उचलली नसल्याचं कोर्टाने म्हटलंय.

 

तसंच तिथली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याची केंद्राचीही होती, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. याप्रकरणी दोन्ही सरकारांना 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.

 

तसंच दंगलग्रस्त लोकांना सरकारनं ताबडतोब मदत पुरवावी, असे आदेशही कोर्टाने दिलेत. छेडछाडीच्या कारणावरून मुझफ्फरनगरमध्ये दंगल उसळली. या दंगलीत 48 जणांना आपला जीव गमवावा लागला.

close