निवडणूक आयुक्त चावलांना हटवण्याची मागणी

January 31, 2009 9:16 AM0 commentsViews: 1

31 जानेवारी दिल्लीपुढचे निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना पदावरून हटवावे, अशी शिफारस मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी यांनी केलीय. द हिंदू या दैनिकानं ही बातमी दिली आहे. नवीन चावला हे काँग्रेसच्या जवळचे आहेत, त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात यावे, असं त्यात म्हटलंय. गोपालस्वामी यांनी आपण या संदर्भात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना पत्र लिहल्याचंही हिंदूनं म्हटलंय. राष्ट्रपतींनी हे पत्र पंतप्रधानांकडे पाठवल्याचं समजतंय. निवडणूक आयुक्तांविषयी राष्ट्रपतींकडे तक्रार करण्याची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे. 20 एप्रिल रोजी मुख्य निवडणूक आयुक्त गोपालस्वामी निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर नवीन चावला निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

close