रेल्वेत महिलेचा विनयभंग,सीबीआयच्या कर्मचार्‍याला अटक

September 13, 2013 12:02 PM0 commentsViews: 913

cbi offiser13 सप्टेंबर : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी सीबीआयच्या एका कर्मचार्‍याला अटक करण्यात आली आहे. चंद्रप्रकाश मलखान सिंग असं या आरोपीचं नाव आहे. चंद्रप्रकाश मलखान सिंग यांच्या विरूद्ध मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसात (GRP) गुन्हा नोंद झालाय.

 

अँटॉप हिल इथं राहणारी एक महिला गुजरात मेल द्वारे अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास करत असताना आरोपीने त्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.आरोपी त्याच ट्रेनच्या डब्यातून प्रवास करत होता. महिलेन त्वरीत ट्रेनमधील टि.सी.ला तक्रार केली.

 

टीसी ने याबाबतची सर्व माहिती रेल्वे हेल्पलाईनला दिली. ट्रेन बोरिवलीला पोहोचल्यावर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी (GRP) आरोपीची चौकशी केली.आणि दादरला रेल्वे पोहचताच त्याला अटक करण्यात आलीय. आरोपी चंद्रप्रकाश मलखान सिंग हा नवी मुंबई सीबीआयमध्ये स्टेनोपदावर कार्यरत आहे. सदरची घटना वलसाडच्या हद्दीत झालेली आहे. त्यामुळे आरोपीला वलसाड पोलिसांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिलीय.

close