युकी भांबरीला ज्युनिअर ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद

January 31, 2009 9:50 AM0 commentsViews: 3

31 जानेवारी भारताच्या युकी भांबरीने इतिहास घडवलाय. 16 वर्षांच्या युकीने ऑस्ट्रेलियन ओपनच्या ज्युनिअर गटात विजेतेपद पटकावलंय. जर्मनीच्या अलेक्झआंडर जॉर्जोदासचा त्याने सरळ सेटमध्ये 6-3, 6-1 असा धुव्वा उडवला. या स्पर्धेत यंदा युकीला अव्वल सिडिंग मिळालं होतं. आणि त्याचा फॉर्मही अव्वल होता. लिअँडर पेस नंतर ज्युनिअर ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा तो एकमेव भारतीय टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी, 1990साली लिअँडरने विम्बल्डन ज्युनिअर तर 1991मध्ये अमेरिकन ओपन ज्युनिअर स्पर्धा जिंकली होती. लिअँडर आणि आता युकी खेरिज रमेश कृष्णननेही फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ज्युनिअर सिंगल्स स्पर्धा जिंकल्या आहेत.

close