नरेंद्र मोदी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार,भाजपची घोषणा

September 13, 2013 5:54 PM1 commentViews: 1122

modi13 सप्टेंबर : होणार..होणार..म्हणत अखेर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध डावलून मोदींची घोषणा करण्यात आलीय. भाजपचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या नावाची घोषणा केलीय. देशाचा मूड बघून अशी घोषणा करण्यात आली असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

 

येणार्‍या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपचं सरकार येणार असा विश्वासही सिंह यांनी व्यक्त केला. मी एका सामान्य परिवारातून आलो, माझ्या सारख्या कार्यकर्त्याला भाजपनं मोठी संधी दिली. या संधीचं सोनं करुन दाखवेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

 

तसंच 2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी कुठलीच कसर ठेवणार नाही. जनतेनं भाजपवर विश्वास ठेवावा देश कठीण संकटातून जातोय. यातून देशाला बाहेर काढण्यासाठी पाठिंबा द्या असं आवाहनही मोदींनी केलं. या पत्रकार परिषदेला सुषमा स्वराज यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

 

तर दुसरीकडे मोदी समर्थकांनी जल्लोष सुरू केलाय. मुंबई आणि दिल्लीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भाजपच्या दिल्ली आणि मुंबईतल्या पक्ष कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं भाजप नेते आणि कार्यकर्ते जमलेत. ढोल-ताशे वाजवत नाचत-गात कार्यकर्ते जल्लोष साजरा करत आहेत. मोदींचे पोस्टर्सही मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेत.

 

  • charu

    भाजपाच्या संसदीय बैठकीत अखेर नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपा-एनडीएचे भावी पंतप्रधान म्हणुनशिक्कामोर्तब झाले.या बैठकीला पक्षाचे अधारस्तंभ, वरीष्ठ आणि अनुभवी नेते लालकृष्ण आडवाणी यांचीअनुपस्थिती मात्र जाणवली. आता प्रसारमाध्यमे आत्तापासूनच आडवाणी आणि मोदी यांच्यातील तथाकथितशीतयुद्धाच्या कथा मोठया चवीने रंगवु लागले आहेत. काहीही असले तरी,नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत काहीही वदंताअसल्या तरी देशाच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांच्याशिवाय दूसरा कोणताही समर्थ पर्याय देशासमोर नाही हे वास्तव आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच अहमदाबादमधील मुस्लिम बंधु-भगिनींनी जल्लोषकेला ही एकच घटना त्यांच्या लोकप्रियतेचा आरसा आहे. अजुन भाजप-एनडीएला सत्ता मिळाली नाही,मिळेल का ते ही माहिती नाही, तरीही मोदी यांचे नाव जाहीर झाल्यानंतर देशभरात एक उत्साहाचे वातावरण निर्माणहोईल यात शंका नाही. श्री. आडवाणी यांनी आता झारीतील शुक्राचार्य न होता मोदी यांना मोठेपणाने आशिर्वाद द्यावा यातच त्यांचे मोठेपण आहे !

close