शिवसेनेला ठोठावला 10,000 रुपयांचा दंड

January 31, 2009 2:24 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी औरंगाबादसंजय वरकडमनसेपाठोपाठ औरंगाबाद पोलिसांनी आता शिवसेनेकडूनही दंडात्मक रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे. औरंगाबाद पोलिसांनी आतापर्यंत तोडफोड करणा-यांकडून वसुलीसाठी सात प्रस्ताव तयार केले आहेत. पोलीस उपायुक्त एम बी तांबडे यांच्याकडे आलेले प्रस्ताव लवकरच जिल्हाधिका-याकंडे पाठवले जाणार आहेत. तोडफोड करणा-या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दंड वसूल करण्याचा कायदा 23 ऑक्टोबरला मंजूर झाला होता. औरंगाबादेत प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात मात्र मनसेच्या आंदोलनानंतर झाली आहे. औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत व्हेरॉक आणि ड्युरोव्हॉल्व्ह कंपनीत तोडफोड करणा-या मनसेकडून 5 कोटी 7 लाख रुपये वसूल करण्याचा प्रस्ताव औरंगाबाद पोलिसांनी तयार केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेकडून 10,000रुपये तर इतर काही कार्यकर्त्यांकडून सुमारे 25,000रुपये वसूल करण्याचे पाच प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त एम बी तांबडे यांच्याकडे आलेले प्रस्ताव लवकरच जिल्हाधिका-याकंडे पाठविले जाणार आहेत. त्यात मनसे आणि शिवसेना या दोनच राजकीय पक्षांचा सध्या तरी समावेश आहे.

close