पेट्रोल 1 रुपये 63 पैशांनी महागले

September 13, 2013 9:17 PM0 commentsViews: 476

petrol price hike13 सप्टेंबर : एकीकडे योजनांना मंजुरीचा देण्याचा सपाटा सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्यांच्या पुढे दरवाढीचं विघ्न कायम आहे. पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा 1 रुपये 63 पैशांनी वाढ करण्यात आलीय ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

 

मागिल महिन्यात रुपयाच्या झालेल्या ऐतिहासिक घसरणीमुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. 31 ऑगस्ट रोजी पेट्रोल 2.35 तर डिझेल 50 पैशांनी महागले होते. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे दरवाढ करण्यात आलीय.

close