देहूत तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती साजरी

January 31, 2009 10:09 AM0 commentsViews: 1

31 जानेवारी, पुणे नितीन चौधरीसंत तुकाराम महाराजांचा चारशेवी या निमित्तान पुण्याजवळील देहू नगरीत गेल्या वर्षभर जन्म चतु:शताब्दी उत्सव साजरा करण्यात आला. त्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज या कार्यक्रमाची सांगता राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणारेय. यावेळी उपमुख्यमंत्री छगन भुजबळही उपस्थित राहतील. गेल्या आठवड्यापासून गाथा पारायणाचंही वाचन करण्यात येतंय. यात अनेक भाविक सामील झालेत. आज या पारायणाचीही सांगता होणारेय. देहु पासून जवळच असलेल्या भामचंद्र डोंगर परिसरात वादग्रस्त डाऊ कंपनीला हटविण्यावरून वारकरी संप्रदायानं आंदोलन केलं होतं. ही कंपनी हटविण्याचा निर्णय कालच राज्य सरकारनं घेतलाय. याबाबत अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील अशी अपेक्षा आहे.

close