उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्याच्या जिभेला चटके

September 14, 2013 4:17 PM5 commentsViews: 1253

nagar story14 सप्टेंबर : केवळ एका प्रश्नाचं उत्तर न देता आल्यानं विद्यार्थ्याच्या जिभेवर चटके देण्याचा अमानुष प्रकार अहमदनगर येथील यशश्री ऍकडमीमध्ये घडलाय. 3 सप्टेंबर रोजी ही घटना घडलीय.

 

नगर-औरंगाबाद रस्त्यावरच्या धनगरवाडी इथल्या यशश्री ऍकेडमीत सहावीत शिकत असलेल्या पवन रोहिडा या विद्यार्थ्याला एका प्रश्नाचं उत्तर देता न आल्यानं त्याला वर्गाच्या बाहेर उभं करण्यात आलं. यानंतर वर्ग शिक्षकांनी पवनला संस्थेच्या अध्यक्षा अनुरिता शर्मा यांच्याकडे नेलं. अनुरिता शर्मा यांनी या विद्यार्थ्याला मारहाण करत जिभेवर आगपेटीच्या काडीने चटके दिले.

 

पवन घरी गेल्यानंतर त्याने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला पण त्याच्या घरच्यांना हा प्रकार दंगा मस्तीतून झाला असावा असं वाटलं. पण दोन दिवसांनंतर त्यांची प्रकृती खालावली. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यानंतर पवनने आपल्यासोबत घडलेली हकीकत पालकांना सांगितली.

 

याप्रकरणी अगोदर पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ केली. मात्र आयबीएन लोकमतच्या टीमने पाठपुरावा केलानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान, ऍकेडमीत असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं प्राचार्यांनी म्हटलंय.

 • shreyas shitre

  १५ वर्षाहून अधिक वर्ष झाले आहेत अनुरिता शर्मा या क्षेत्रात आहेत . मुलांशी व प्राचार्यांशी कसे वागावे हे त्यांना चांगले माहिती आहे . हे फक्त शाळेला व अनुरिता शर्मा यांना विनाकारण बदनाम करायच या पलीकडे काही नाही . लवकरच हे सत्य सर्वान समोर येईल .

 • shreyas shitre

  १५ वर्षाहून अधिक वर्ष झाले सौ.अनुरिता शर्मा शिक्षण क्षेत्रात आहे. सौ.अनुरिता शर्मा ह्या ‘ Top 10 women in Ahmednagar ‘ आहेत . विद्यार्थी व प्राचार्यांशी कसे वागावे हे त्यांना चांगले माहित आहे . हे सर्व शाळेला आणि सौ.अनुरिता शर्मा बदनाम करायच या पलीकडे काही नाही . सत्य लवकरच समोर येईल .

 • Gaurav Mahajan

  This is so not true. . I am a past student of anurita teacher as well as suvarna teacher.
  I am what i am today because of teachers like them.

  There has to be a different side to this story. And it has to be investigated.

  this can never happen under anurita madams academy . .

 • Satyajit Sangamnerkar

  Anurita teacher is one of the best teachers we have had in our school. She would never do such thing.
  This above news is unreal and such thing can never happen.

 • Apoorva Bhawik

  Anurita belongs to a family of educationist. Yashshree is not just a school to extract money for her. Yashshree is heart and soul for Anurita. Media must try to see the other side of the coin too before molesting anyone or alligating. She is the best educationist and will always be as she loves all her students and staff as her own.

close