पवारांचं विधान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला न शोभणारं -मुख्यमंत्री

September 14, 2013 2:17 PM0 commentsViews: 770

Image img_148512_babacm_240x180.jpg14 सप्टेंबर :रेंगाळलेल्या फायलींचा मुद्दा आता दिवसेंदिवस अधिकच चिघळत चाललाय. शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आणि भाषेमुळे मला आश्चर्य वाटलं. ही भाषा आणि हे विधान पवारांच्या व्यक्तिमत्त्वाला न शोभणारं आहे, अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी ही टीका केली.

 

तसंच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवरही टीका केलीय. पैसे मिळवणं हा शिवसेनेचा एकमेव अजेंडा आहे. मुंबई महानगरपालिका गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण शिवसेनेकडे व्हिजनचा अभाव आहे. स्थायी समितीत काय चालतं हे प्रत्येकाला माहित आहे अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

 

पुण्यात झालेल्या एक सभेत शरद पवार यांनी फाईलीवर सही करता येत नाही हाताला काय लकवा भरलाय का अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांनी नियमबाह्य फाईलींना वेळ लागतो असा प्रतिउत्तर दिलं होता. त्यांनी आघाडीतील नेत्यांमध्ये फाईलीवरून कलगतुरा रंगला होता.

close