अतिवृष्टीग्रस्त भागाला महिन्याभरात पॅकेज -पवार

September 14, 2013 2:07 PM0 commentsViews: 161

Image img_217502_shradpawronajitdada_240x180.jpg14 सप्टेंबर : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेऊन महिन्याभरात पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलीय.

 

शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. आज सकाळी शरद पवार नागपूरमध्ये दाखल झाले. या दौर्‍यात पवार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. आज ते वर्धा जिल्ह्याला भेट देणार आहेत, यानंतर यवतमाळमधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

 

काही दिवसांपूर्वी केंद्राचे एक पथक विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून गेलं. राज्य सरकारतर्फे या भागासाठी दोन हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. पण वेळेअभावी निधी न मिळाल्यामुळे येथील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्देवी घटना घटल्यात. विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केलीय. या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

close