भारताची सावध सुरुवात

January 31, 2009 10:18 AM0 commentsViews: 3

31 जानेवारी कोलंबोभारत आणि श्रीलंकेदरम्यान दुसरी वन डे कोलंबोत सुरू झाली. टॉस जिंकून भारताने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात चांगली झाली नाही. 6 रन्सवर सचिन आऊट झाला. त्यानंतर गंभीर आणि सेहवागने फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. गंभीर 27 आणि सेहवाग 42 रन्सवर आऊट झाले. दम्बुलातल्या दमदार विजयानंतर टीम इंडियांचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारताची टीम कोलंबोत सलग सात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरत आहे. पण धोणीच्या टीम इंडियाला कोलंबोतील या प्रेमदासा स्टेडियमवरची त्यांची शेवटची मॅच विसरून चालणार नाही. याच मैदानावर गेल्या वर्षी अजंता मेंडीसच्या जादुई बॉलिंगसमोर टीम इंडिया 227 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना फक्त 103 रन्सवर आऊट झाली होती. मुरलीधरनलाही वन डेत सर्वाधिक विकेटचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी अवघ्या 2 विकेटची गरज आहे.

close