दाभोलकरांच्या खुनाचा छडा लावण्यात पोलीस यशस्वी होतील-गृहमंत्री

September 14, 2013 10:19 PM1 commentViews: 422

14 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांचा कसून शोध घेतला जात आहे. यासाठी सर्व पोलीस दल, क्राईम ब्रांच, वरिष्ठ अधिकारी आरोपींच्या मागावर आहे. यासाठी सर्व अंगाने तपास सुरू आहे. सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू आहे. यासाठी पोलीस शर्थीने प्रयत्न करत आहे. आरोपींचा शोध लागेपर्यंत पोलीस दल मागे हटणार नाही अशी माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिली. आर.आर. पाटील यांनी आज सातार्‍यात डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि तपासाबाबत माहिती दिली.

  • Sham Dhumal

    दाभोळकरांचे खूनी अजून मिळत नाहीत हे गृहखात्याचे अपयश नाही का?

close