385 बोगस ग्रंथालयांची मान्यता रद्द होणार

September 14, 2013 10:45 PM0 commentsViews: 286

Image img_202452_rajeshtope_240x180.jpg14 सप्टेंबर : राज्यातल्या 385 बोगस ग्रंथालयांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केलीय.

 

शासनानं केलेल्या ग्रंथालयांच्या पडताळणीत ही ग्रंथालयं बोगस असल्याचं आढळून आलंय. या ग्रंथालयांना सरकारी अनुदान देण्यात येतं मात्र ही ग्रंथालय सरकारच्या नियमांचं पालन करत नाहीत असंही त्यांनी सांगितलं.

 

राज्यातल्या 40 टक्के ग्रंथालयांमध्ये त्रुटी आढळल्या असून किरकोळ स्वरुपाच्या त्रुटी असलेल्या पावणे दोन हजार ग्रंथालयांना सुधारणा करणार्‍याच्या सुचना देण्यात आल्याचही त्यांनी सांगितलं.

close