अपुर्‍या सरकारी अनुदानामुळे वर्ध्यात कुष्ठरोग्यांचे हाल

January 31, 2009 11:17 AM0 commentsViews: 4

31 जानेवारी, वर्धा नरेंद्र मत्तेअपु-या सरकारी अनुदानाचा फटका वर्ध्यातल्या महारोगी सेवा समितीलाही बसत आहे. सरकारी अनुदान अपुरं असल्यानं वर्ध्यामधल्या दत्तपूर इथल्या संस्थेतील कुष्ठरोग्यांचे हाल होतायत. खर्च झेपत नसतानाही, महारोगी सेवा समिती कार्य करतीये. मात्र डोळ्यांवर झापडं लावून बसलेल्या सरकारला, या रु ग्णांच्या हालअपेष्टांचं काहीही सोयरसुतक नाहीये. वर्ध्याजवळ दत्तपूर मध्ये महारोगी सेवा समिती कुष्ठरोग्यांसाठी कार्य करते. 1936 मध्ये ही संस्था स्थापन झाली. आलेल्या कुष्ठरोग्यांची इथं निट काळजी घेतली जाते , निवासाचीही व्यवस्था आहे. कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी इथे पंधरा कर्मचारी आहेत. अनेक कुष्ठरोगी इथे उपचारासाठी येतात. पण सरकारकडून तुटपुंजं अनुदान दिलं जात असल्यानं रुग्णांची गैरसोयच जास्त होते. " महिना 450 किंवा 500 रुपये मिळणा-या अनुदानात ते कसं काय शक्य आहे, " असा प्रश्न वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जोशी यांनी विचारला. दत्तपूरच्या मनोहर कुष्टधामात सध्या दीडशेवर रुग्ण आहेत. रुग्णांचे उपचार आणि कर्मचार्‍यांचं वेतन मिळून इथला खर्च पंधरा लाखांच्या घरात जातो. सरकारकडून अनुदान मिळत नसल्यानं संस्थेला तीनशे एकर जमीन विकावी लागलीये. " रुग्णांना कधी औषधं वेळेवर मिळत नाहीत तर कधी त्यांच्या जेवणाचेही हाल होतात. त्यामुळे आम्ही कर्ज काढले. हे कर्ज फेडण्यासाठी सरकारच्या अपु-या अनुदानामुळे आम्हाला संस्थेच्या मालकीची असणारी तीनशे एकरांची जमीन विकावी लागलीये, " अशी माहिती महारोगी सेवा समितीचे सदस्य मुलचंद बडजाते यांनी दिली. " रूग्णांना कधी वेळेवर औषधे मिळत नाहीयेत, तर कधी जेवणाचेही हाल होतायत, " ही व्यथा गंगुबाई येल्लारे यांनी मांडली. महात्मा गांधी , आचार्य विनोबा भावे अशा महान लोकांनी वर्ध्यात कुष्ठरोग्याची सेवा केली .पण आत्ताच्या सरकारी धोरणांमुळे महारोग सेवा समितीला या रुग्णांची सेवाही करता येत नाही . सरकारला मात्र कुठलीही फिकीर नाहीये.

close