समस्या सैन्यात नाही,दिल्लीमध्ये-नरेंद्र मोदी

September 15, 2013 9:38 PM0 commentsViews: 628

narendra modi15 सप्टेंबर :सैनिकांच्या समस्येच्या बाबतीत हे सरकार असंवेदनशील आहे. व्होटबँकेसाठी दिल्ली सरकार भारतीय सैन्यात फूट पाडत आहे. सीमारेषेवर होत असलेल्या कारवायासाठी सैन्य कमजोर नसून दिल्लीत बसलेलं सरकार कमजोर आहे. आणि याचा उपायही दिल्लीतच असून यासाठी सरकार बदलणे हाच एक उपाय आहे अशा टीका करत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

 

पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हरियाणा इथं माजी सैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यासभेत मोदींनी नेहमी प्रमाणे काँग्रेस सरकारला धारेवर धरलं. आपल्या भाषणाच्या सुरूवातील मोदींनी सैनिकांच्या प्रती आदर व्यक्त केला. आज युद्धाचे रंग बदलत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धानंतर देशांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. देशाला दहशतवाद,नक्षलवादाचा सामना करावा लागत आहे. व्होटबँकेसाठी देशाचे तुकडे केले जात आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे सैन्याकडून शिकण्याची गरज आहे असंही मोदी म्हणाले.

 

तसंच पाकिस्तानाला मैत्रीच्या सल्ला देत पाकने दहशतवादी कारवाया थांबव्यात. दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर जागा देऊ नये हे जर झाले तर पाकही विकसीत राष्ट्र होऊ शकते. पाकची प्रगतीही भारताविरोधात कारवाया करून होणार नाही. वारंवार पाक सैनिक सीमारेषेवर धुडगूस घालत आहे पण तरीही सरकार मुंग गिळून गप्प आहे. आपले सैनिक या कारवायात शहीद होत आहे पण या सरकारला काहीच फरक पडत नाही. अशा सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची वेळ आलीय असंही मोदी म्हणाले. यावेळी आपण लहानपणी सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही अशी खंतही बोलून दाखवली.

close