पवारांचं घुमजाव, ‘मुख्यमंत्र्यांवर नाही, तर सरकारच्या धोरणांवर टीका’

September 16, 2013 3:44 PM2 commentsViews: 551

sharad pawar16 सप्टेंबर : आपण मुख्यमंत्र्यांचं नाही तर राज्य सरकारच्या धोरणांसदर्भात प्रतिक्रिया दिली होती, असं घुमजाव आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. तसंच मुख्यमंत्री जी काही धोरणं राबवतात, निर्णय घेतात ते योग्यच असून त्याला राष्ट्रवादी आणि केंद्राची मदत मिळाली पाहिजे असं कौतुकही पवारांनी केलं.

 

मागील आठवड्यात पुण्यात झालेल्या एका सभेत शरद पवार यांनी फायलीचा मुद्दा काढत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. फाईलींवर सही करायला हाताला लकवा भरला का अशी टीका पवारांनी केली होती. पवारांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. नियमबाह्य फाईलींवर सही करायला वेळ लागतो असं उत्तर दिलं होतं. या टीकेमुळे आघाडीचं वातावरण चांगलंच तापलं होतं.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कलगीतुराच रंगला होता.मुख्यमंत्र्यांच्या प्रतिउत्तरामुळे पवारांनी केलेला वार पवारांवरच पलटत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र आज खुद्द पवारांनी यु-टर्न घेत प्रकरणावर पडदा टाकला. दरम्यान, ओल्या दुष्काळाचा फटका बसलेल्या विदर्भाला केंद्राकडून वेगळं पॅकेज जाहीर होणार नाही, राज्य सरकार याबाबत योग्य काम करत असून केंद्रातर्फे सर्वोतोपरी मदत केली जाईल असंही पवारांनी स्पष्ट केलंय.

  • Guest

    साहेबांचे आयुष्यच घुमजाव करण्यातच गेले…..फक्त शिवसेना

  • ऋषिकेश काळे पाटील

    साहेबांचे आयुष्यच घुमजाव करण्यातच गेले…..फक्त शिवसेना

close