आसारामचा तुरुंगात मुक्काम वाढला,जामीन अर्ज फेटाळला

September 16, 2013 4:20 PM0 commentsViews: 865

asaram bapu arrest_12316 सप्टेंबर : अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम बापूचा जामीन अर्ज जोधपूर सेशन्स कोर्टाने फेटाळून लावलाय. कोर्टाने पुन्हा आसाराम बापूच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केलीय. आता आसाराम बापूचा 30 सप्टेंबरपर्यंत तुरूंगात मुक्काम वाढलाय.

 

15 सप्टेंबरला बापूची न्यायालयीन कोठडीची मुदत संपली होती. आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने आणखी 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

 

दरम्यान, आसाराम बापूचे सहायक पीडित मुलीच्या कुटुंबीयांना धमकी देत असल्याचा आरोप त्या मुलीच्या वकिलांनी केलाय. यासंबंधीची ऑडिओ क्लिप वकिलांनी कोर्टात सादर केली. आसाराम बापूविरोधातला खटला मागं घ्यावा, अन्यथा तुम्हाला ठार मारू अशी धमकी या मुलीच्या कुटुंबीयांना दिली जात असल्याचा आरोप वकिलांनी केलाय.

close