बैलगाडी शर्यतीत बैलांचा अमानुष छळ,आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

September 16, 2013 6:45 PM0 commentsViews: 644

sangal bail gadi16 सप्टेंबर : सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये बैलांचा अमानुष छळ करण्यात आल्याचं उघड झालंय.

 

धक्कादायक गोष्ट म्हणजे गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं 25 ऑगस्ट रोजी ही शर्यत भरवण्यात आली होती. बैलांच्या नाकात तारा घुसवण्यात आल्या होत्या. तर बैलगाडीला लावण्यात आलेल्या खिळ्यांमुळेही बैलांना गंभीर जखमा झाल्या.

 

कुकटोळी गावातील शर्यत घेणार्‍या आयोजकांवर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सावळज मधील आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. मुंबईतील प्राणीमित्र अजय मराठे आणि अनिल कटारिया यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

close