नागपुरात चिमुरडीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार

September 16, 2013 8:40 PM0 commentsViews: 1243

latur rape16 सप्टेंबर : नागपूरमध्ये वाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये. 7 वर्षांच्या मुलीवर 15 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केला.

 

13 सप्टेंबर रोजी दुपारी ही मुलगी घरात एकटीच असताना, ही दोन्ही मुलं तिच्या घरात शिरली आणि त्यांनी सामूहिक तिच्यावर बलात्कार केला. आधी मुलीनं घाबरून घरी हा प्रकार सांगितला नाही. नंतर दोन दिवसांनी 15 सप्टेंबरला, त्रास सुरु झाल्यानं तिनं आईला घडलेला प्रकार सांगितला.

 

या दोन मुलांपैकी एकाची आई होमगार्ड शिपाई आहे, त्यामुळे आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही अशी धमकी या मुलांनी तिला दिली होती. या दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दोन्ही मुलांना ब्लु फिल्म बघण्याचा नाद होता, अशी माहिती तपासादरम्यान पोलिसांना मिळालीये.

close