35 हजार गणेश मूर्तीचं दान

September 16, 2013 10:59 PM0 commentsViews: 253

16 सप्टेंबर : यंदाच्या गणेश विसर्जनावेळी कोल्हापुरकरांनी तब्बल 35 हजार मूर्ती दान करत 200 टन निर्माल्य नदीत न टाकता गोळा करुन एक नवा आदर्श निर्माण केलाय. त्यामुळे कोल्हापूरचा यंदाचा गणेशोत्सव हा आगळावेगळा ठरलाय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर कोल्हापूरमध्ये नुकतीच विवेक निर्धार परिषदही घेण्यात आली. गणेशोत्सवात मूर्ती दान करुन कोल्हापूरकरांनी दाभोलकरांना श्रद्धांजलीच वाहिलीय.

close