मोदींसाठी भाजपचे ‘मुस्लिम जोडो’ अभियान

September 17, 2013 3:41 PM0 commentsViews: 1264

narendra modi17 सप्टेंबर : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आता भाजपचे आता अल्पसंख्यांकांशी जवळीक वाढवण्याचे प्रयत्न सुरू झालेत. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या 64 व्या वाढदिवसाचं औचित्य साधलं जातंय. भारतीय जनता अल्पसंख्याक मोर्चानं भाजपमध्ये एक लाख मुस्लिमांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मागिल आठवड्यात शुक्रवारी मोठ्या नाराजी नाट्यानंतर भाजपने नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. मोदींच्या वाढदिवसाच्या चार दिवसांअगोदर भाजपने निर्णय घेऊन एका प्रकारे मोदींना वाढदिवसाची भेट दिली. आज मोदींचा वाढदिवस भाजपचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे.

 

सोशल साईट असो, अथवा गल्लीबोळ प्रत्येक ठिकाणी आपल्या लाडक्या नेत्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. मोदींच्या वाढदिवसांचं औचित्य साधून गुजरातमधील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने तब्बल एक लाख मुस्लिम मतदारांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

यासाठी गुजरातमधल्या सगळ्या जिल्ह्यांत एक आठवडाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या अभियानासोबतच 20 हजार कार्यकर्ते वेगवेगळी सामाजिक कार्य हाती घेणार आहे. दरम्यान, मोदींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये त्यांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

close