रस्ते खड्‌ड्यात, मोदी सरकारला कोर्टाची नोटीस

September 17, 2013 2:53 PM0 commentsViews: 706

gujrath potholls17 सप्टेंबर : गुजरात हायकोर्टाने खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारच्या रस्ते आणि बांधकाम विभाग आणि इतर विभागांना नोटीस बजावली आहे. गुजरातमधल्या रस्त्यांची अवस्था खराब आहे, अलीकडे बांधलेले किंवा दुरुस्त केलेले रस्तेही फारसे चांगले नाहीत. या प्रकरणी हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती.

 

त्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती भास्कर भट्टाचार्य, न्यायमूर्ती जे बी परडीवा यांच्या खंडपीठाने रस्त्यांचा दर्जा आणि त्यांची देखभाल याविषयी काही मार्गदर्शक तत्वे आहेत का, खराब रस्त्यांसाठी कोणाला जबाबदार ठरवण्याची तरतूद आहे का आणि अशा जबाबदार व्यक्तीविरोधात कोणती कारवाई करण्यात आली आहे का, असा प्रश्न सरकारला विचारलाय.

 

एकीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे गुजरातमधल्या विकासाचं मॉडेल सर्व देशापुढे मांडत असतात. त्यामध्ये गुजरातमधले उत्तम रस्ते हाही एक मुद्दा असतो. अशावेळी गुजरात सरकारलाच हायकोर्टाने नोटीस बजावल्यामुळे मोदींच्या विकास मॉडेलविषयी प्रश्न उपस्थित झालेत.

close