कांद्याचे भाव पुन्हा कडाडले, 55 ते 80 रुपये प्रति किलो

September 17, 2013 3:30 PM0 commentsViews: 263

Image img_136092_onion436_240x180.jpg17 सप्टेंबर : गेल्या कित्येक दिवसांपासून दरवाढीसोबत पाठशिवणीचा खेळ खेळणार्‍या कांद्याने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. राज्यात आणि देशात कांद्याचे भाव पुन्हा कडाडले आहे.

 

राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये कांदा 55 रुपये किलोपासून 80 रुपये किलोपर्यंत विकला जातोय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 6 वर्षातला विक्रमी दर नोंदला केला. तिथं 6 हजार 100 रु क्विंटल दरानं कांदा विकला जातोय.

 

नवी मुंबई एपीएमसी बाजारात कांद्याचा घाऊक दर 58 रुपये किलो, सोलापूर एपीएमसी बाजारात 61 रुपये किलो आणि नाशिकमध्ये घाऊक बाजारात 55 रुपये किलो आहे. कांद्याचं उत्पादन घटल्यामुळे भाववाढ झाल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. नवीन कांदा बाजारात आल्यानंतर हे भाव कमी होतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येतेय.
कांद्याचे भाव
जिल्हा- दर (प्रति किलो)  

  • ठाणे- 80 रु.
  • कोल्हापूर- 60-65 रु.
  • औरंगाबाद- 65 रु.
  • नागपूर- 65 रु.
  • जळगाव- 60-65 रु.
  • नवी मुंबई – 70 रु.
  • सोलापूर- 65 रु.

 

close