राजाच्या कार्यकर्त्यांची महिला कॉन्स्टेबलला मारहाण

September 17, 2013 8:18 PM5 commentsViews: 2839

17 सप्टेंबर : लालबाग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी वाढतच चाललीय. कार्यकर्त्यांनी आज चक्क महिला कॉन्स्टेबलला मारहाण केली. राजाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी पीएसआय अशोक सरमळे यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली होती. या मुजोर कार्यकर्त्यांविरोधात काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतला लालबागचा राजा म्हणजे सर्वसामान्य गणेशभक्तांसाठी श्रद्धा आणि आस्थेचं स्थान…पण गेल्या काही दिवसांपासून, कार्यकर्त्यांनी भक्तांना केलेल्या धक्काबुक्कीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि पोलीसही त्यातून सुटलेले नाहीत. एकंदरीतच त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय.

 
दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांबच्या लाब रांगा दिसणारं हे नेहमीचं दृश्य.. लालबागच्या राजाचं दर्शन मिळवण्यासाठी तासन्‌तास रांगेत उभं राहण्याची भक्तांची तयारी असते. मात्र एवढ्या तपश्चर्येनंतर त्यांच्या वाट्याला समाधानाने दर्शन घेण्याचा योग येत नाही, उलट त्यांना कार्यकर्त्यांची धक्काबुक्कीच सहन करावी लागते. मंडळाचे पदाधिकारी मात्र ही बाब नाकारतात.

 
देवाच्या दारी सगळे सारखे असं म्हटलं जातं. पण ते नेहमीच काही खरं होताना दिसत नाही. सेलिब्रिटींना राजाचं अगदी सहज आणि जास्त वेळ दर्शन मिळतं. त्याच वेळी सर्वसामान्य भाविकांना धक्काबुक्की होत असते. महिलाही या तडाख्यातून सुटत नाहीत. गृहमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचं म्हटलंय. थोरामोठ्यांशी अगदी गोडीगुलाबीनं वागणारे राजाचे कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्याशी कसे वागतात हे भाविकांना कळत नाही असं नाही. राजाच्या दर्शनाची ओढ म्हणा की, त्याच्याबद्दलच्या प्रचलित दंतकथा म्हणा.. भाविकांची संख्या कमी होत नाही. पण म्हणून त्यांना अशी अपमानास्पद वागणूक मिळाली तरी चालेल असं नक्कीच नाही.

 • Bipin Chavan

  शेवटी अती तेथे माती…..

 • Arun Kurhe

  देवाच्या भक्तांचा अपमान करणाऱ्या कार्यकर्त्यांना देव बघतोय.
  भक्तांचा अपमान हा देवाचा अपमान.
  दाभोलकरांना आपला जीव गमवावा, परंतु अजूनही आपल्याला अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातला फरक समजत नाही.

 • Rani

  kay garaj aahe lal bagh la jaynya chi…

  Rani

 • Prathamesh

  सेलिब्रिटींना पण ह्या मंडळात येऊन फुकटची पब्लिसिटी मिळते म्हणून येतात. जर व्हीव्हीआयपींनाही लालबागचा राजा पावलाय म्हणून… नवस फेडण्यासाठी ते दरवर्षी न बोलवता येत असतात तर मग या व्हीव्हीआयपींना थेट स्टेजवर एन्ट्री कशी देतात..? सामान्य भक्तांप्रमाणं त्यांना का नाही नवसाच्या रांगेत किंवा मुखदर्शनाच्या रांगेत उभं करतं..? की देवाच्या दरबारात व्हीव्हीआयपी म्हणून त्यांना वेगळा प्रोटोकॉल असतो..?

 • Prathamesh

  ही चुकी ह्या मंडळात जाणार्‍या भाविकांची पण आहे, सर्व गणपती एकच आहेत हे का समजत नाही या लोकांना मीडिया आणी सेलिब्रिटीं मुळे ह्या मंडळाचे नाव झाले आहे, काही नवीन पिढी घरच्या देवाला कधीच पाया पडत नाही पण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात ते केवळ एक नाइट आऊट मज्जा म्हूणून.

close