सोन्याच्या किमतीचा नवा उच्चांक

January 31, 2009 1:21 PM0 commentsViews: 4

31 जानेवारी, मुंबईमार्केटमध्ये सोन्याच्या किमतीनं नवा उच्चांक गाठलाय. सोन्याच्या दरानं 14,975च्या स्तराला स्पर्श केला. गेल्या वर्षी 10 ऑक्टोबरला हा दर 14,320 रुपये होता. जानेवारी महिन्यात सोन्याची आयात 90 टक्कयांनी कमी झाली आहे. त्याचा फटका मार्केटमध्ये बसतोय. सर्वसामान्य ग्राहकांना 14,975 रुपये दरानं सोनं खरेदी करावं लागणार आहे. सध्याचे सोन्याचे दर पाहता, जुनं सोनं मोडण्याकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.

close