जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

September 17, 2013 9:09 PM0 commentsViews: 1151

17 सप्टेंबर : लोकसभेसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा एकदा जुंपलीय. राज्यात जागा वाटपावर कुणीही काही म्हटले त्याला अर्थ नाही. जागा वाटपाचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत घेतील असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावलाय. मात्र माणिकराव ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिलंय. काँग्रेसला 29 जागा तर राष्ट्रवादीला 19 जागा मिळाल्या पाहिजेत, याबद्दल चर्चा झालीय अ शी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली. तर हा वाद निर्थक असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी वेगळी भूमिका मांडलीय. मतदारसंघात असलेल्या पक्षाच्या प्रभावानुसारच जागावाटप व्हावं, असं त्यांनी म्हटलंय. आघाडी आवश्यक असून त्यामुळेच निवडणुकीत यश मिळेल, असं त्यांनी म्हटलंय. तसंच अंतिम निर्णय दिल्लीतच होईल असं सांगत त्यांनी माणिकरावांना धक्का दिलाय. गेल्या महिन्याभरापासून जागावाटपाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यात खडाजंगी होत आहे.

close