शहिदाच्या वीरपत्नीला पोलिसांनी हाकलून लावले

September 17, 2013 7:24 PM0 commentsViews: 1548

17 सप्टेंबर : आज मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. शहिदांच्या वीर पत्नींचा मात्र पोलिसांनी अनादर केला. मुख्यमंत्र्यांना भेटून आपलं दुखं माडण्याचा प्रयत्न करणार्‍या वीर पत्नींना पोलिसांना हाकलून लावल्याची संतापजनक घटना घडली. हिंगोलीच्या वीरपत्नी भाग्यरथाबाई दांडगे यांना मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचून आपलं दुख मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या वीरपत्नीला ढकलून बाहेर काढलं. पोलिसांच्या अशा वागण्यामुळे या वीर पत्नीच्या डोळ्यात पाणी आलं..आणि तीनं आपली भावना आयबीएन लोकमत समोर मोकळी केली.

close