साखर कारखान्यावरुन राणे-सावंत यांच्यात वाद चिघळला

September 17, 2013 9:53 PM0 commentsViews: 645

rane savant17 सप्टेंबर : उद्योगमंत्री नारायण राणे आणि आमदार विजय सावंत यांच्यात सिंधुदुर्गात होणार्‍या साखर कारखान्यावरून वाद चिघळलाय.

 

सावंत यांना राणेंच्या आधी साखर कारखान्याला परवानगी मिळालीय. पण ही परवानगी त्यांनी सरकारला फसवून घेतल्याचा आरोप करत राणेंनी कोर्टात धाव घेतलीय. गगनबावडा इथल्या डी. वाय. पाटील कारखान्यापासून सावंत यांच्या कारखान्यापर्यंत हवाई अंतराचा फेर सर्व्हे राणेंनी करून घेतला.

 

केंद्र सरकारच्या यंत्रणेकडून एकदा मोजणी होऊन परवानगी मिळालीय. मग राणेंच्या सांगण्यावरून दबावापोटी सर्व्हे ऑफ इंडियानं फेर सर्व्हे का केला असा सवाल सावंत यांनी विचारलाय. आणि फेरसर्व्हेला विरोध केलाय. तरीही स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सावंत यांच्या गेटचं कुलुप तोडून सर्व्हे ऑफ इंडियाने मोजणी केल्यामुळे राणे आणि सावंत यांच्या कार्यकर्त्यात तणाव निर्माण झालाय.

 

दुसरीकडे राणे व्हेंचर्स कंपनीने साखर कारखान्यासाठी घेतलेली जागाही मयत जमीन मालकांच्या बनावट सह्या करून घेतली गेली असल्याचं याआधीच सावंत यांनी निदर्शनास आणून दिलंय. जर सावंत यांना आधी परवानगी मिळालेली असेल तर नेहमी विकासाच्या बाजूने बोलणारे नारायण राणे सावंत यांच्या मार्गात का आडकाठी आणतायत असा सवाल आता राणेंचे विरोधक करत आहे.

close