श्रीलंकेपुढे विजयासाठी 257 रन्सचं टार्गेट

January 31, 2009 1:35 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी कोलंबोकोलंबोत सुरू असलेल्या दुस-या वन-डेत भारतानं श्रीलंकेपुढे विजयासाठी 257 रन्सचं टार्गेट ठेवलंय. भारताची सुरुवात अडखळत झाली. सचिन तेंडुलकरची पहिली विकेट घेत कुलकेसराने भारताला पहिला धक्का दिला. पण रिप्लेमध्ये सचिन नॉट आऊट असल्याचं कळलं. त्यानंतर महारूफने गौतम गंभीरला 27 रन्सवर आऊट करत भारताला दुसरा धक्का दिला. दुखापतीनंतर मॅचमध्ये खेळणारा सेहवाग मोठा स्कोअर उभारणार असं वाटत असताना चोरटी धाव काढण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. युवराजने हाफ सेंच्युरी ठोकत आपला फॉर्म कायम ठेवला. पण त्यालाही खराब अंपायरिंगचा फटका बसला आणि 66 रन्सची महत्त्वाची खेळी करत तो पॅव्हेलियनमध्ये परतला.झहीर खानं आणि प्रविण कुमारनं फटकेबाजी करीत भारताला अडीचशे पार धावसंख्या गाठून दिली.

close