मुख्यमंत्री होण्याची भुजबळांची इच्छा

January 31, 2009 2:59 PM0 commentsViews: 5

31 जानेवारी मुंबईआगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री होण्यास आपण इच्छुक आहोत असं उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. आयबीएन-लोकमतला दिलेल्या खास मुलाखतीत ते म्हणाले, आपल्या मनातील इच्छा पक्षश्रेष्ठींना सांगणे गैर नाही. शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठी, आमदार घेणार. पण त्यादृष्टीने आपण चांगली कामं केली पाहिजेत असंही ते म्हणाले.छगन भुजबळ यांची खास मुलाखत लवकरच आपण पाहू शकता आयबीएन-लोकमतच्या वेब साईटवर www.ibnlokmat.tv

close