मराठा आरक्षणाबाबत मुंडे-भुजबळ भेट

January 31, 2009 3:28 PM0 commentsViews: 3

31 जानेवारी मुंबईमराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.परंतु मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळता कामा नये आणि त्यांना आरक्षण देतांना सध्याच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये,अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांनी मांडली आहे. मुंडे यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.मराठा समाजाला आरक्षण देताना सध्याच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांनी मांडली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाहेर जर मराठा समाजाला सरकार आरक्षण देत असेल तर त्याला विरोध नाही.मराठ्यांना राजकीय आरक्षण मिळू नये छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे हे बडे नेते एकत्र आलेत. भुजबळ आणि मुंडे यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरेही होते. या नेत्यांची एक बैठक मुंबईत झाली. यामळे मराठा समाजाला राजकीय आरक्षण द्यायला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधल्या ओबीसी आणि मागास समाजातील नेत्यांचा विरोध असेल असं उघड झालंय.

close