…पुढच्या वर्षी लवकर या !!

September 18, 2013 12:49 PM0 commentsViews: 1027

ganpati bappa nirop18 सप्टेंबर  गणेश चतुर्थीला गणरायांचं मोठ्या थाटा-माटात आणि वाजत-गाजत आगमन झालं आणि बघता बघता दहा दिवस उलटलेही. दहा दिवसांचा मुक्काम संपवून घरगुती गणेशांपासून ते सार्वजनिक मंडळांच्या गणपती बाप्पांचं आज विसर्जन करण्यात आलं. यात मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूतीर्ंच्या मिरवणुका या लक्षवेधक ठरल्यात. राज्यभरात मुंबईसह, पुणे,नाशिक,औरंगाबाद, रत्नागिरी,नागपूर इथं मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत निरोप देण्यात आला. मात्र बाप्पाला निरोप देताना 9 भक्त पाण्यात बुडाल्यामुळे विसर्जनाला गालबोट लागले. बेळगावमध्ये वीजेच्या धक्क्यान चार भक्तांचा मृत्यू झाला. तर राज्यात 5 भक्तांचा पाण्यात बुडन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

चंद्रपुरात गांधी गणपती निसर्जन न करण्याचा निर्णय
तर चंद्रपुरातील कन्यका मंदिरात असलेली गांधी गणपतीची मूर्ती गेल्या 73 वर्षापासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहे. स्वातंत्र लढ्याच्या काळात महात्मा गांधी चंद्रपुरात आले होते. त्यांच्या कार्यानं प्रभावित झालेल्या काही तरुणांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिकृती असलेल्या गांधी गणपतीची स्थापना केलीय. या तरुणांमध्ये माजी मुख्यमंत्री कन्नमवार हे देखील होते. जोपर्यंत स्वराज्याबरोबर सुराज्य येत नाही तोपर्यंत या गणपतीचं विसर्जन करु नये असा निश्चय या तरुणांनी केला होता. ही गणेशाची मूर्ती अजूनही विसर्जित करण्यात आली नाही.

close