डाऊ कंपनी चाकणमधून हलवणार- मुख्यमंत्री

January 31, 2009 12:58 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी इंद्रायणी नदीकाठी चाकणजवळ उभारली जाणारी डाऊ केमिकल कंपनी तिथून हलवणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण सध्यातरी प्रकल्प चाकणमधून हलवण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. हा प्रकल्प कदाचित गुजरातमध्ये जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

close