मुझफ्फरनगर दंगल:भाजप,बसपा नेत्यांविरोधात अटक वॉरंट

September 18, 2013 5:39 PM0 commentsViews: 549

muzafarnagar roits18 सप्टेंबर : मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी आमदार, खासदारांसह 16 राजकीय नेत्यांविरोधात कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे. यामध्ये भाजप, बसप आणि काँग्रेसच्या नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

 

नेत्यांच्या अटकेमुळे कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी लखनऊमध्ये पोलिसांनी ठिकठिकाणी जमावबंदी लागू केलीय. विधानसभेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. या दंगली प्रकरणी भाजपचे आमदार हुकुम सिंह,संगीत सोम,सुरेश राणा आणि भारतेंद्र सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पण अजूनही या आमदारांनी अटक करण्यात आलेले नाही.

 

याच्यासोबतच बसपाचे नेते कादीर राणा,सलीम राणा,जमील अहमद आणि काँग्रेस नेते सईदुज्जमा यांच्यासह अन्य नेत्यांवर गुन्हे दाखल आहे. पण यांनाही अटक करण्यात आलेली नाही. प्रशासनाने वेळीच कारवाई केली नाही म्हणून दंगल आणखी उसळली असा आरोप भाजपचे नेते संगीत सोम यांनी केला.

close