भूपती-नॉव्हेल्स जोडीला दुहेरीचं उपविजेतेपद

January 31, 2009 4:15 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये भारताचा टेनिसपटू महेश भूपती आणि त्याचा जोडीदार मार्क नॉव्हेल्स यांना पराभव झाला. बॉब आणि माईक या ब्रायन बंधूनी त्यांचा 6-2, 5-7, 0-6 असा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीचं तिस-यांदा विजेतेपद पटकावलं. भूपती-नॉव्हेल्स जोडीने पहिला सेट 6-2ने सहज जिंकत मॅचवर आपली पकड ठेवली. पण दुस-या सेटमध्ये ब्रायन बंधूनी सरस खेळ करत मॅचमध्ये पुनरागमन केलं. तिस-या आणि महत्त्वाच्या सेटमध्ये ब्रायन बंधूनी आक्रमक खेळ केला आणि इंडो-बहामा जोडीला संधीच दिली नाही. सेट 6-0 असा सहज जिंकत त्यांनी चॅम्पियनशीपवर आपलं नाव कोरलं. आता रविवारी महेश भूपती सानिया मिर्झाबरोबर मिश्र दुहेरीची फायनल खेळणार आहे.सेरेना विल्यम्सनं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलंय.ऑस्ट्रेलियन्स ओपन स्पर्धेचं हे तीचं चौथं विजेतेपद आहे. फायनलमध्ये सेरेनाचा सामना वर्ल्ड नंबर तीन दिनारा साफिनाबरोबर होता. पण सेरेनानं संपूर्ण मॅच आपलं वर्चस्व गाजवलं. पहिला सेट सेरेनानं 6-0 असा सहज खिशात टाकला. दुस-या सेटमध्ये साफिनानं थोडीफार लढत दिली पण अखेर 6-3 असा दुसरा सेट जिंकत सेरेनानं मॅच सहज आपल्या खिशात टाकली.

close