73 वर्षांपासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत

September 18, 2013 8:19 PM1 commentViews: 906

चंद्रपुरातील कन्यका मंदिरात असलेली गांधी गणपतीची मूर्ती गेल्या 73 वर्षापासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत आहे. स्वातंत्र लढ्याच्या काळात महात्मा गांधी चंद्रपुरात आले होते. त्यांच्या कार्यानं प्रभावित झालेल्या काही तरुणांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिकृती असलेल्या गांधी गणपतीची स्थापना केलीय. या तरुणांमध्ये माजी मुख्यमंत्री कन्नमवार हे देखील होते. जोपर्यंत स्वराज्याबरोबर सुराज्य येत नाही तोपर्यंत या गणपतीचं विसर्जन करु नये असा निश्चय या तरुणांनी केला होता. ही गणेशाची मूर्ती अजूनही विसर्जित करण्यात आली नाही.

  • sagar bhilare

    me karnaar ya ganpaticha visarjan

close