डॉ.दाभोलकरांचा खून सरकार स्पॉन्सर्ड?-राज

September 19, 2013 2:57 PM1 commentViews: 1438

raj arrest warant19 सप्टेंबर : सगळ्या प्रकारचे मारेकारी सापडतात परंतू डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही सापडत नाही. कोणतीही घटना घडली तर अख्ख पोलीस फोर्स कामाला लागतं पण दाभोलकर खून प्रकरणात असं काहीही कुठंच होत नाहीय. तपास सुरु असला तरी मारेकरी अजूनही हातात नाही. संशय म्हणून पाहिला तर हा खून सरकार स्पॉन्सर्ड तर नाही ना असा संशय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

 

त्याचवेळी सीबीआय किंवा इतर संस्थाकडे हा तपास देण्याएवजी राज्यातल्या पोलिसांनीच हा तपास करावा, मुंबई पोलीस आणि राज्य पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे जर पोलिसांनी ठरवलं तर खुनींना शोधून काढणं शक्य आहे असंही राज ठाकरे म्हणाले.

 

राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेऊन सरकारवर संशय घेतला. दाभोलकरांच्या खुनाला उद्या एक महिना पूर्ण होत आहे पण अजूनही आरोपी मोकाटच आहे. या अगोदरही राज यांनी दाभोलकर खून प्रकरणावर सरकारवर टीका केली होती. दरम्यान, राज ठाकरेंचा हा प्रसिद्धीसाठी स्टंट असून दुसरं काहीही नाही असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लगावला.

  • Jitendra Jadhav,Mumbai

    The statement given by Shri.Raj thakarey is his individual opinion.But it is the fact that after the one month no one is arrested or not any satisfied result comes in front of the maharashtra people.I think there might be some internal politics behind this or government may no the real fact behind Late.Shri Narendra Dabholkar’s murder case and they want to hide the truth from the people of the maharashtra.
    In such environment the doubt taken by Shri.Raj thakarey is definitely correct – Jitendra Jadhav,Mumbai

close