आदर्श प्रकरणी शिंदेंना क्लिन चिट

September 19, 2013 3:14 PM0 commentsViews: 296

Image img_154642_aadarshsocitysushilkumarshinde_240x180.jpg19 सप्टेंबर : आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना मोठा दिलासा मिळालाय. सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांना क्लीन चिट दिली.

 

याचिकाकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी शिंदे यांना या प्रकरणात आरोपी ठरवण्यात यावं अशी मागणी केली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार वाटेगावकर यांनी कन्हैय्यालाल गिडवाणी आणि शिंदे यांनी आदर्श आयोगासमोर दिलेल्या निवेदनाचा आधार याचिका दाखल करण्यासाठी घेतला होता.

 

मेजर खानखोजे यांना आदर्श सोसायटीत फ्लॅट मिळावा याासाठी शिंदे यांनी शिफारस केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र सीबीआयनं आपल्या प्रतिज्ञापत्रात मेजर खानखोजे हे शिंदे यांच्याशी संबंधित नव्हते असा म्हटलंय. कन्हैयालाल गिडवाणी आणि मेजर खानखोजे हे आता हयात नाहीत.

close