कांद्याची दरवाढ रोखण्यास निर्यात मूल्य वाढवणार

September 19, 2013 2:27 PM0 commentsViews: 282

Image img_128412_onion4356_240x180.jpg19 सप्टेंबर : कांद्याची सतत होणारी भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार कांद्याच्या किमान निर्यात मुल्यात 650 डॉलर प्रति टनवरून 900 डॉलर प्रति टन अशी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवर जरी थोडासा परिणाम होणार असला देशांतर्गत बाजारपेठेवर फारसा परिणाम होणार नाहीये.

 

प्रत्येक पावसाळ्यात कांद्या दरवाढीचा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र यंदा कांद्याने चांगलाच वांदा केलाय. कांद्याचा भाव आता 60 ते 80 रुपये प्रति किलोच्या घरात गेलाय. कांद्याचा भाव वाढल्यामुळे हॉटेल,खानावळीमध्ये ताटातूनच कांदा बाहेरच पडल्याचं चित्र आहे. सरकारने कांद्याच्या दरवाढ आटोक्यात यावी यासाठी प्रयत्न सुरु केलेय. राज्यभरात साठेबाजी करणार्‍या कांद्या व्यापार्‍यांवर अंकुश यावा यासाठी थेट धाडी टाकण्याची माोहिम हाती घेतली.

 

कांद्याची दरवाढ अशीच सुरू राहिली तर कांदा शंभरी गाठणार असी शक्यता आहे. दरम्यान, कांद्याच्या भावात झालेली वाढ ही पावसामुळे झाली असून तात्पुरती आहे, असा दिलासा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिलाय. यावर्षी कांद्याचं पीक वाढणार आहे, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांद्याला सुरवात होईल आणि किंमती नियंत्रणार येतील असं शरद पवार यांनी नुकतच नागपुरात म्हटलंय.

close