आणखी एक चिखलीकर,लाचखोर खाडेची अवैध संपत्ती उघड

September 19, 2013 2:25 PM3 commentsViews: 985

gajanana khade19 सप्टेंबर : सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर प्रकरणानंतर आणखी एका लाचखोर अभियंत्याची अवैध संपत्ती उघड झालीय. एक्झेक्युटिव्ह इंजिनिअर गजानन खाडे असं या अभियंत्याचं नाव आहे.

 

मंगळवारी त्यांना अँटिकरप्शन विभागानं 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या घराची तपासणी केल्यावर 31 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सव्वा किलो सोनं सापडलं.

 

खाडे यांचे औरंगाबाद शहरात 20 प्लॉट्स आणि गेवराई तालुक्यात 20 ते 25 एकर शेती असल्याचंही पुढे आलंय. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातल्या भ्रष्ट अधिकार्‍यांच्या संपत्तीचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

खाडेची अवैध संपत्ती

 • - 31 लाख रुपयांची रोकड
 • - 1 किलो 250 ग्रॅम सोनं
 • - औरंगाबाद शहरात 20 भूखंड
 • - वाशिम आणि गेवराईत 20 एकर शेती
 • - परभणी, बीड, औरंगाबादमध्ये 11 बँक खाती
 • Punam Raut

  असे बरेच भ्रष्ट कर्मचारी आहेत सरकारी ऑफिस मध्ये, सामान्य लोक १५-२० हजार कमवायला महिना भर राबतात आणि या कर्मचाऱ्यांची दिवसाची कमाई तेवढी आहे, सर्व Contractors त्यांचे contract पास करायला खिशात पाकीट घेऊन फिरतात शिपायापासून साहेबापर्यंत पैसे देतात तेव्हा कुठे त्यांची कोट्यावधी रुपयांची बिल पास होतात, सामान्य माणसाला माहितही नसतात अशा कोट्यावधी रुपयांच्या योजना जनतेसाठी पास होतात आणि मध्ये हे कर्मचारी लोक सगळा पैसा खातात, हे थांबल पाहिजे कुठेतरी!!

 • Ravi Kolekar

  Punam I agree with you.

 • VEDPRAKASH

  shame to him

close