राज यांनी माहिती असल्यास द्यावी -गृहमंत्री

September 19, 2013 9:16 PM1 commentViews: 1980

19 सप्टेंबर : राजकीय द्वेषातून कुणीही आरोप करत असतील तर त्याला उत्तर देण्याची आवश्यक्ता नाही अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं. तसंच अशा प्रकरणात शासनाचा हस्तक्षेप केला जात नाही. कारण पोलीस जो तपास करतात तो कोर्टात द्यावा लागतो. जर कुणाला काहीही माहिती असेल तर त्यांनी पोलिसांकडे द्यावी आम्ही त्याचीही चौकशी करु असा सल्लावजा टोलाही लगावला.

 

दाभोलकर खून प्रकरणी आज दाभोलकर यांनी मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवास्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर संशय घेतला. सगळ्या प्रकारचे मारेकारी सापडतात परंतू डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही सापडत नाही. तपास सुरु असला तरी मारेकरी अजूनही हातात नाही. संशय म्हणून पाहिला तर हा खून सरकार स्पॉन्सर्ड तर नाही ना असा संशय राज ठाकरे यांनी व्यक्त केलाय.

 

राज यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी हा राज यांची प्रसिद्धीसाठी स्टंट आहे असा टोला लगावला. तर शिवसेना सत्तेत असताना केणींची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाला राज यांनी स्पॉन्सर्ड आहे असं का म्हटलं नाही अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक केली.

  • Vijay

    R R patil tumhi tar jevha Maharashtra che matri pad mila lya pasun kahi kele nahi tar kiman prshnachi uttar tari nit dya tya shivay tumchya kadun kahi apekhsa pan nahi ahe

close