‘मराठा समाजाला हवेत 20 ते 25 टक्के आरक्षण’

September 20, 2013 4:30 PM0 commentsViews: 861

rane20 सप्टेंबर : इतर मागासवर्गीय घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला 20 ते 25 टक्के स्वतंत्र ओबीसी आरक्षण देण्यात यावं अशा मागणीची सर्वाधिक निवेदनं समितीकडे आलेली आहेत. या आरक्षण समितीला सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्या मुदतीत समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल अशी माहिती मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी दिली.

 

या समितीच्या पुढच्या बैठका औरंगाबाद, नाशिक आणि पुण्यात होणार आहेत. त्यावेळी ज्याला कोणाला मराठा आरक्षणाविषयी निवेदनं द्यायची असतील त्यांनी ती द्यावीत असं आवाहन राणे यांनी केलंय. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरातल्या मराठा समाजाची मतं जाणून घेण्याबरोबरच पुरावे आणि निवेदनं घेण्यासाठी सीबीडी बेलापूरमधल्या कोकण भवनात आज समितीची बैठक झाली.

 

यावेळी मराठा समाजाला राजकीय आरक्षण नकोय तर शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण हवंय अशी भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी मांडली. तर मराठा समाजाला सध्याच्या ओबीसी कोट्याव्यतिरिक्त स्वतंत्र ओबीसी कोटा निर्माण करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली.

close