प्रीती झिंटाच्या पार्टीवर पोलिसांची कारवाई

February 1, 2009 5:46 AM0 commentsViews: 3

1 फेब्रुवारी मुंबईप्रीती झिंटाच्या वाढदिवसाच्या पार्टीवर रात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे विरजण पडलं. बांद्राच्या पाली हिल भागात क्वाटम पार्क बिल्डिंगच्या दहाव्या मजल्यावर ही पार्टी सुरू होती. रात्री तीन वाजेपर्यंत म्युझिक सिस्टमचा असह्य आवाज सुरू असल्याची तक्रार बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी केल्यावर पोलिसांनी ही पार्टी थांबवली. त्यामुळे या पार्टीला आलेल्या शाहरूख खान, करण जोहर, अर्जुन रामपाल, फरहान अख्तर, संजय कपूर, चंकी पांडे आणि अमृता अरोरा या खास पाहुण्यांनाही काढता पाय घ्यावा लागला. या आधीही पोलिसांनी रात्री दीड वाजता म्युझिक सिस्टमचा आवाज कमी करण्याविषयी सूचना केली होती. मात्र पोलिस गेल्यानंतर पुन्हा आवाज सुरू झाल्याची तक्रार या बिल्डिंगमधल्या लोकांनी पोलिसांकडे केली.

close